भारतीय जनता पक्षाने गेल्या 10 वर्षापूर्वी मेनीफेस्टो तयार केला होता. मात्र त्याप्रमाणे त्यांनी गेल्या दहा वर्षात काहीच केले नसल्याची टीका काँग्रेसचे माजी आमदार रमेश कुडची यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
गॅस पेट्रोलचे दर कमी होण्याऐवजी भाजपने वाढवली आहेत भाजपमुळे गरिबांचे हाल होत आहेत. मुद्दा सोडून भाजप आता नागरिकांकडून मते मागते आहे हिंदू मुस्लिम राम मंदिर यावर भाजप राजकारण करते आहेत.
मोदींना दुसऱ्या देशाचे मुस्लिम लोक चालतात मात्र भारतातील मुस्लिम लोक मोदींना नकोशे झाले असल्याची टीका यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केली
तसेच त्यांनी कारवार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे यांचा प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कारवारला गुरुवारी येत आहे. त्यांचा पक्ष शिवसेना आहे मात्र ते भाजपच्या प्रचाराकरिता कारवारला येत आहेत .
याच ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. एकेकाळी सीमा समन्वयक मंत्री असलेले एकनाथ शिंदे हे मराठी माणसाच्या बाजूने उभे राहण्याकरिता झटपट करत होते मात्र आता त्यात सीमा भागात येऊन भाजपला मतदान करा याकरिता प्रचार करणार आहेत.
त्यामुळे मराठी माणसाने नक्की काय करावे असा प्रश्न माजी काँग्रेसचे आमदार रमेश कुडची यांनी उपस्थित केला आहे.