महापालिके पार पडली विशेष सर्वसाधारण सभा
रस्ता रुंदीकरण भरपाई करिता वीस कोटी रुपये
विरोधी गटाच्या निर्णयाला कडाडून विरोध
बेळगाव महानगरपालिकेचे सभागृहामध्ये विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महापौर सविता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली या सभेत प्रामुख्याने रस्ता रुंदीकरणातील भरपाईसाठी 20 कोटी रुपये देणे यावर वादळी चर्चा झाली. बेळगाव शहरातील बँक ऑफ इंडिया ते जुना पीबी रोड रुंदीकरणाच्या भूसंपादन प्रक्रियेसाठी 20 कोटी रुपये प्रांताधिकारी तथा भूसंपादन अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचा निर्णय महापौर सविता कांबळे यांनी जाहीर केला तर सत्ताधारी गटाच्या या निर्णयामुळे विकास कामांना फटका बसणार आहे असे सांगत विरोधी गटांनी सध्या पाच कोटी रुपये जमा करून न्यायालयाकडून वेळ मागून घेण्याची मागणी केली. पण त्याला दाद देण्यात आली नसल्याने विरोधी गटाने या निर्णयाला कडाडून विरोध केला.