Share News

बेंगळूर मध्ये पुकारणार संप मागण्या मान्य न केल्याने संपाचा निर्णय

अखिल कर्नाटक स्टेट कम्युनिटी हेल्थ NHM कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज युनियन(s) बंगलोर ही 6192 ची नोंदणीकृत कामगार संघटना आहे.कर्नाटक राज्यातील 28 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य मोहिमेंतर्गत आरोग्य आणि कल्याण केंद्रांमध्ये काम करणारे सामुदायिक आरोग्य अधिकारी या संघटनेच्या कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी पगारवाढ व कामाच्या परिस्थितीबाबत मागण्यांच्या निवेदन देण्यात आली

तसेच याच्या पूर्ततेसाठी राज्य संघातर्फे गेल्या एक वर्षापासून अनेक आवाहन पत्रे देत आहेत .अनेकवेळा जिल्हा आरोग्य विभागाच्या बैठका देखील झाल्या आहेत. मात्र या मागण्या पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष झाले कामगारांनी संप पुकारण्याचा निर्णय घेतलाय

जिल्ह्याचे कुटुंब कल्याण अधिकारी त्यांनी 12.07.2023 व 20.11.2023 रोजी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित राहून या मागण्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली परंतु आतापर्यंत मागण्या मान्य केल्या नसल्याने बंगलोर मध्ये संप पुकारण्याच्या तयारी आता 15 फेब्रुवारी ला बेंगळूर मधील फ्रीडम पार्क मध्ये कर्नाटक स्टेट कम्युनिटी हेल्थ NHM कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज युनियन संप पुकारणार आहेत.


Share News