राजधानीत ‘गुढी पाडवा’ साजरा
वसंत ऋतूची सुरुवात, समृद्धी आणि आनंदाचे प्रतीक गुढीपाडवा मराठी नवीन वर्षाचे प्रतीक असलेला एक उत्साही सण आज रोजी साजरा केला गेला. महाराष्ट्रासह राजधानी दिल्लीस्थित महाराष्ट्र सदन येथे गुढीपाडवा मोठ्या उत्साहात आज साजरा करण्यात आला.
कॉपरनिकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनात, निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली व गुढीची पूजा करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मराठी बांधवांना गुढीपाडव्याच्या आणि नववर्षारंभाच्या शुभेच्छा दिल्या. अपर निवासी आयुक्त डॉ.नीवा जैन, सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार व स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यावेळी उपस्थित होते. यावेळी सदनातील कर्मचारी उपस्थित होते.