Share News

दरवर्षी प्रमाणे या वर्षी नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग मंदिरात ज्योतिबाचा प्रकट दिन सोहळा येत्या रविवार दिनांक 14 एप्रिल रोजी नार्वेकर गल्ली येथे पार पडणार आहे.तसेच दुपारी चार वाजता ज्योतिर्लिंग देवस्थान वाडी रत्नागिरी कोल्हापूर येथे दवणा निमित्त पालखी आणि बैलगाड्या मार्गस्थ होणार आहेत.

सालाबाद प्रमाणे नार्वेकर गल्ली बेळगाव येथून पायी जाणारे भक्त पालखी व बैलगाड्यासह 14 रोजी सायंकाळी चार वाजता ज्योतिर्लिंग देवस्थान नार्वेकर गल्ली येथून वाजत गाजत गवळी गल्ली गोंधळी गल्ली समादेवी गल्ली खडे बाजार शनिवार खुट काकतीवेस रोड मार्गे पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी सर्व भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे

तसेच हेबाळ संकेश्वर निपाणी कागल कोल्हापूर येथे वस्ती करून 19 एप्रिल रोजी वाडी रत्नागिरी येथील ज्योतिर्लिंग देवस्थान येथे पालखी आणि भक्त बैलगाड्या पोचणार आहेत.

त्यानंतर दवणा पोर्णिमा 22 एप्रिल रोजी रात्री बारा वाजता तर 23 एप्रिल रोजी पालखी सोहळा करून दिनांक 28 एप्रिल रोजी कोल्हापूर सर्कल बेळगाव येथे आंबील घुगऱ्यांची जत्रा करून पालखी नार्वेकर गल्ली बेळगाव येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात पोहोचणार आहे असे दादा महाराज भक्त मंडळातर्फे कळविण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9901058111 नंबर वर संपर्क साधावा.


Share News