ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण
बेळगावात मुस्लिम बांधवांचा रमजान ईद साजरा
बेळगावात आज मुस्लिम बांधवांनी रमजानचा पवित्र सण भक्ती भावाने साजरा केला .यावेळी सकाळी अंजुमन ए इस्लाम येथे ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक प्रार्थना केली.
यावेळी हजारो मुस्लिम भाविक या सामूहिक प्रार्थनेत सहभागी झाले होते प्रार्थना झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना मिठी मारून रमजानच्या शुभेच्छा दिल्या.
बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ समाजाचे नेते आणि मुले देखील सहभागी झाली होती. यावेळी डीसीपी रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस आणि सीआरपीएफ पोलिसांनी कडे कोट बंदोबस्त ठेवला होता.