नरगुंदकर भावे चौकात अवैध पार्किंग घोटाळ्याचा पर्दाफाश
पार्किंगच्या नावाने नागरिकांकडून वसुली
बेळगाव शहरातील नरगुंदकर भावे चौक येथे पार्किंग करण्यात आलेल्या दुचाकीस्वरांकडून दैनंदिन फेरीवाल्यांकडून शुल्क वसूल करण्याची जबाबदारी देण्यात असलेली व्यक्ती पार्किंग शुल्काप्रमाणेच पावती देत आहे हा प्रकार एका नागरिकाला समजताच त्यांनी जाब विचारला आणि आपण अवैधरीत्या पार्किंग शुल्क आकारात असल्याने पाहुन त्या व्यक्तीला चांगलीच धारेवर धरले.
महापालिकेने अधिकृत पार्किंग करिता शहरात जागा उपलब्ध करून दिली आहे.शहरातील बापट गल्ली कार पार्किंग तसेच क्लब रोडवर कार पार्किंग अधिकृतपणे पार्किंग शुल्क आकारले जाते. मात्र बाजारपेठेत दैनंदिन फेरीवाले दुचाकी स्वरांकडून शुल्क आकारात आहेत. त्यामुळे महापालिकेने याकडे वेळीच लक्ष देऊन त्यांच्यावर आवर घालने गरजेचे बनले आहे