Share News

श्रीराम सेना हिंदुस्तान च्या वतीने आंदोलन

हुबळी घडलेल्या घटनेचे बेळगावात उमटले पडसाद

त्या नराधामाला शिक्षा देण्याची केली श्री राम सेना हिंदुस्थानने मागणी

श्रीराम सेना हिंदुस्तान बेळगाव च्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदना श्रीराम सेना हिंदुस्तान च्या कार्यकर्त्यांनी हिंदू युवतीवर मुस्लिम युवकाने केलेल्या हत्येचा निषेध केला आहे.

हुबळी मधील बीव्ही कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या नेहा हिरेमठ या विद्यार्थिनी वर फयाज या युवकाने चाकूने 9 वेळा हल्ला केला. यात ती मृत झाली अशी घटना कॉलेजमध्ये घडत असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

त्यामुळे अशा क्रूर नराधमाला फाशीची शिक्षा न देता त्याचा एन्काऊंटर करावा अन्यथा आम्ही कायदा हातात घेऊन त्या नराधमाला योग्य शिक्षा देऊ अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.


Share News