चहा विकून बीम्सच्या निवासी डॉक्टरांनी केले अनोखे आंदोलन
राज्यातील प्रशिक्षणार्थी वैद्यकीय महाविद्यालयीन निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ कराण्याची मागणी
राज्यातील प्रशिक्षणार्थी वैद्यकीय महाविद्यालयीन निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करावी, यासाठी बेळगावच्या बीम्स हॉस्पिटलमध्ये आज एक अनोखं आंदोलन करण्यात आले.
वैद्यकीय महाविद्यालयात निवासी डॉक्टरांनी हॉस्पिटल परिसरात स्वतः चहा विक्रीकरून हे आंदोलन छेडले.
चहा विक्रेत्यांच्या पेक्षाही आम्हाला कमी वेतन मिळतं. राज्यात विद्यार्थ्यांची ट्युशन फी इतकी अमाप आहे की आम्हाला दैनंदिन जीवन जगण्यासाठी खूप अडथळे निर्माण होत आहेत.
इतर राज्यात विद्यार्थ्यांची फी कमी असून त्यांचे वेतन सुद्धा जास्त आहे. मात्र आमच्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. आमच्या या आंदोलनात 400 हून अधिक निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत.
दरम्यान अपत्कालीन म्हणजेच इमर्जन्सी सेवा आम्ही सुरू ठेवल्यात आहेत, तरी सरकारने आमच्या
मागण्या त्वरित मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी निवासी डॉक्टरांनी केली…