Share News

गोपाळ मुरकुटे यांचे मरणोत्तर नेत्रदान

पाच महिन्यापूर्वी पत्नीनेही केले होते मरणोत्तर नेत्रदान

बेळगाव:
बापट गल्ली येतील प्रतिष्ठित नागरिक श्री गोपाळ रामचंद्र मुरकुटे वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धाकाळाने निधन झाले. निधनानंतर सामाजिक कार्यकर्ते अंकुश केसरकर यांनी जायंट्स आय फौंडेशनचे संस्थापक मदन बामणे यांच्याशी संपर्क साधून नेत्रदानाविषयी सांगितले लागलीच बामणे यांनी केएलई नेत्रपेढीशी संपर्क साधून रात्री उशिरा नेत्रदान करून घेतले. डॉ मित आचार्य यांनी नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण केली
पाचच महिन्यापूर्वी गोपाळ मुरकुटे यांच्या पत्नी गीता मुरकुटे यांचे निधन झाले होते त्यांनीही मरणोत्तर नेत्रदान केले होते.
जायंट्स आय फौंडेशनच्या वतीने मुरकुटे परिवाराचे आभार मानण्यात आले व इतरांनीही याचे अनुकरण करून नेत्रहीनांना ही सृष्टी पाहण्याची संधी द्यावी असे आवाहन करण्यात आले.

गोपाळ मुरकुटे हे मराठा मंडळ पॉलिटेक्निकचे माजी कर्मचारी होते तसेच म. ए. समितीचे कार्यकर्ते सुनील व अनिल मुरकुटे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे सुना एक मुलगी जावई व नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी सदाशिवनगर स्मशानभूमी येथे सकाळी दहा वाजता करण्यात येणार आहेत.


Share News