वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात – जेवणाची आमदारांनी केली पाहणी
जेवणात सापडल्या होत्या अळ्या
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी शहरात वसतिगृहाची सोय करण्यात आली. शहरात अनेत ठिकाणी मागासवर्गीय तसेच इतर वसतिगृहे आहेत. या वसतिगृहांना निकृष्ट प्रतीचा धान्यपुरवठा केला जात आहे. स्वयंपाक्यांकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आज बेळगाव उत्तर च्या आमदारांनी वसतिगृहाची स्वयंपाकाची पाहणी केली.आणि जेवणाचा दर्जा तपासला
शनिवारी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी वसतिगृहात जाऊन आंदोलन केले होते . जोपर्यंत अधिकारी येऊन पाहणी करणार नाहीत तोपर्यंतविद्यार्थी आंदोलन मागे घेणार नाहीत, असा पवित्रा घेतला. अखेर वसतिगृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी वसतिगृहाला भेट देऊन सर्व माहिती जाणून घेतली त्यानंतर आमदारांनी सुद्धा येऊन पाहणी करून जेवणाचा दर्जा तपासला