मालमत्ता करात १० टक्के वाढ केल्याने ग्रामपंचायतीला घेराव
ग्रामपंचायतीला घेराव घालून संताप
बेळगाव तालुक्यातील हिंडलगा ग्रामपंचायतीने मालमत्ता करात १० टक्के वाढ केल्याने ग्रामस्थांनी आज ग्रामपंचायतीला घेराव घालून संताप व्यक्त केला.त्यानंतर जिल्हा पंचायत सीईओ यांना निवेदन दिले .
हिंडलगा गावात मालमत्ता करात १०% वाढ करण्यात आली आहे. ग्रामस्थांचे हित न जपणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांचा काय उपयोग. त्यांनी जनहिताचे रक्षण करावे. त्यांनी केलेल्या कामांच्या माहितीची प्रत जनतेला द्यायला हवी. आम्ही कायदेशीर लढाईसाठी तयार आहोत. काकती, बेनकनहळ्ळी, कंग्राळी (बी.के) आणि कंग्राली (केएच) गावांमध्ये मालमत्ता दर कमी आहे. हे धोरण असेच सुरू राहिल्यास ग्रामपंचायत आमची घरे विकत घेईल, भाडोत्री देईल असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला. यावेळी हिंडलगा ग्रामस्थ मोठ्या संख्येनेउपस्थित होते.