शहरातील मराठी फलक काढण्याकरिता आंदोलन
शहरात फलकांवर कन्नड मध्ये मजकूर नसल्याने महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन
कन्नड रक्षण वेदिकेचा महापालिकेला घेरावा
बेळगाव शहरात आज कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेला घेरावा घालून आंदोलन केले आणि शहरात ज्या ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत त्यावर 60% मजकूर कन्नड मध्ये नसल्याने आक्षेप घेऊन आंदोलन केले. राज्य सरकारच्या आदेशानुसार कर्नाटकात 60% फलक कन्नड मध्ये असणे अनिवार्य आहे मात्र बेळगावात इंग्लिश आणि मराठी मध्ये फलक लावण्यात आल्याने आक्षेप घेत कन्नड रक्षण वेदिकाच्या कार्यकर्त्यांनी आज महानगरपालिकेला घेरावा घालून आंदोलन छेडले आणि महापालिकेच्या आयुक्तांना निवेदन देऊन हे फलक लवकरात लवकर हटवावे अशी मागणी केली.