भटक्या कुत्र्यांनी घेतला 2 आठवड्यात 28 जणांचा चावा
बेळगावात वाढले भटक्या कुत्र्यांचे हल्ले
भटक्या कुत्र्यांची बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
बेळगावात मागील आठवड्यात भटक्या कुत्र्याने 14 जणांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा भटक्या कुत्र्यांनी 14 जणांवर कुत्र्याने हल्ला केला आहे.यामुळे भटक्या कुत्र्यांचे वाढते हल्ले रोखण्याकरिता भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आज शहरातील नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे. भटक्या कुत्र्यांनी बेळगाव आतील अनेक लहान मुलांचा चावा घेतला आहे. माणसांवर कुत्रे करत असलेले हल्ले हे वाढत आहेत त्यामुळे या कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी महापालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भटक्या कुत्र्यांचे हल्ले शहरवासीयांना चिंताजनक ठरू लागले आहेत. भटक्या कुत्र्यांचे हल्ले थांबणार कधी असा उपस्थित होत आहे. गेल्या 2आठवड्यात 28 जणांचा भटक्या कुत्र्यानी चावा घेतला आहे.यामध्ये बालकांचा समावेश अधिक आहे. तर एका तरुणाचा रॅबिसमुळे जीव गेला आहे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान बालके टार्गेट होत असल्याचेही समोर येऊ लागले आहे. शिवाय या हल्ल्यामुळे बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे याबाबत जिल्हा प्रशासन महानगरपालिका आणि पशु संगोपन खाते ही सुस्त असल्याचे चित्र दिसत आहे. अलीकडे बेळगावात बेवारस कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे.