विविध देशांतील निवडणूक आयोगांचे प्रमुखांनी घेतला निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा
जिल्हा तथा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली संपूर्ण माहिती
लोकसभा निवडणुकीची तयारी आणि प्रक्रियेचे विविध टप्पे पाहण्यासाठी दाखल झालेल्या विविध देशांतील निवडणूक आयोगांचे प्रमुख आणि अधिकाऱ्यांनी आज बेळगावातील वनिता विद्यालयाच्या शाळेच्या प्रांगणात निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास केला. यावेळी त्यांनी निवडणुक पूर्व कामकाजाचा आढावा घेतला .याप्रसंगी जिल्ह्धिकारी तथा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी संपूर्ण माहिती दिली .
यावेळी कंबोडियाच्या राष्ट्रीय निवडणूक परिषदेचे सदस्य हेल सारथ, कंबोडियाच्या राष्ट्रीय निवडणूक परिषदेचे मुख्य सचिव हॉउट बोरिन, मोल्दोव्हाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे सदस्य शा दाना मँटेनुआ, मोल्दोव्हाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या स्थानिक जिल्हा निवडणूक आयोगाचे प्रमुख एड्रियन गामार्टा इसानू, नेपाळ निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश कुमार थापलिया, नेपाळ निवडणूक आयोगाचे उपसचिव थानेस्वारबुसल, सेशेल्स निवडणूक आयोगाचे प्रमुख डॅनी सिल्वा लुकास, सेशेल्स निवडणूक आयोगाचे आयुक्त नॉरलिस निकोलस रोझ होरो, ट्युनिशिया निवडणूक आयोगाचे (आयएसआयई) मनश्री मोहम्मद तिली ,ट्युनिशिया हाय कमिशन फॉर इलेक्शन्स (ISIE) च्या प्रादेशिक संचालक जेलाली नबील बेळगावला आले होते