Share News

लोकसभा निवडणूक कामासाठी 1524 बसेस,

परिवहन सेवेवर दोन दिवस परिणाम

बेळगाव – लोकसभा निवडणूक कार्यासाठी वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाकडून एक हजार पाचशे चोवीस बसेस निवडणूक आयोगाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील दोन दिवस परिवहन सेवेवर परिणाम जाणवणार आहे.परिवहन मंडळांनी दोन दिवस विविध मार्गांवरील बससेवा रद्द केल्या आहेत.सहा व सात मे रोजी शहर व ग्रामीण मार्गावरील बसेस कमी असणार आहेत.
मतदान कार्यासाठी म्हणून हुबळी ग्रामीण आगारातून 85 बसेस सह शहर आगारातून 84,धारवाड 124,गदग 132,बेळगाव 169,कारवार 137,हावेरी 224,चिकोडी 350 आणि बागलकोट मधून 279 अशी एकूण 1524 बसेस निवडणूक कार्यासाठी असणार आहेत. यामुळे सोमवारी व मंगळवारी वाहतूक सेवेत व्यत्यय येणार आहे.


Share News