लिंगायत पंचमसाली समाजाची महापरिषद
महापरिषदेत सरकारचा निषेध
2 A मधून आरक्षण देण्याची मागणी
अखिल भारतीय लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे याकरिता जगद्गुरु श्री बसव मृत्युंजय स्वामीजी आणि बेळगाव जिल्हा वकील संघटना तालुका युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने आज बेळगावात लिंगायत पंचमसाली महापरिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या परिषदेत सरकारने लिंगायत समाजाकडे केलेल्या दुर्लक्षाचा निषेध करण्यात आला लिंगायत समाजाच्या मुलांचे शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे रोजगार 2A मधून करावे तसेच लिंगायत समुदायासाठी ओबीसी आरक्षणासाठी सातवा टप्पा भाग म्हणून आरक्षण द्यावे अशी मागणी यावेळी महापरीषदेमध्ये करण्यात आली.