सिंधुदुर्गातील महाराजांच्या मूर्ती संदर्भात पत्रकार परिषद
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मंत्री यांनी माफी मागावी – काँग्रेसची मागणी
समस्त शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप
सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती कोसळल्यानंतर बेळगाव मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आणि महाराष्ट्रात भाजप राजकारण करत असल्याचा आरोप करण्यात आला. 23 डिसेंबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थित महाराजांचा मूर्तीचे अनावरण करण्यात आले. मात्र अवघ्या आठ महिन्यातच महाराजांची मूर्ती कोसळली असल्याने यावर भाजप नेते काहीच बोलत नसल्याचा आरोप करत आक्षेप घेण्यात आला. आणि महाराष्ट्रातील नेत्यांनी समस्त भारतातील शिव भक्तांची माफी मागावी अशी मागणी करण्यात आली त्याचबरोबर काँग्रेस या संदर्भात बेळगाव मध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील दिला.