बेळगाव
नुकत्याच झालेल्या पावसामुळे जीर्ण झालेली अंगणवाडी इमारत व तीस वर्षे जुनी इमारत मोकळी करून नवीन बांधण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला असल्याची महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली पुढे त्या म्हणाल्या की, नवीन अंगणवाडी इमारतींसाठी विभागाने ४७ कोटी रुपये दिले आहेत.
राज्यात सरकार ६९ हजार अंगणवाड्या चालवत आहे. यापैकी ५० हजार अंगणवाड्या आमच्याच इमारतीत तर १२ हजार अंगणवाड्या भाड्याच्या इमारतीत चालतात. उरलेल्या अंगणवाड्या सरकारी शाळा, सामुदायिक इमारती आणि संघटनांच्या इमारतींमध्ये चालतात.
राज्यात ज्या 12 हजार अंगणवाड्यांना स्वतःची इमारत नाही, त्यापैकी 6,000 अंगणवाड्या महसूल विभागाने दिल्या आहेत. या इमारतीच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात सुमारे 200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. निधी यापूर्वीच जारी करण्यात आला आहे. उर्वरित टप्याटप्याने सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाकडून मुलभूत सुविधांसह अंगणवाड्यांची इमारत पाळणाघरात रूपांतरित करण्यात येत आहे अशी माहिती दिली