गोधोळी गावात बिबट्या
बिबट्यामुळे नागरिक भयभीत
मोबाईल कॅमेरात बिबट्याचे दृश्य कैद
खानापूर तालुक्यातील गोधोळी गावात आज बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.काही दिवसांपूर्वी या बिबट्याने कुत्र्याची शिकार केली होती. आता पुन्हा हा बिबट्या दुसऱ्या गावात दृष्टीस पडला आहे गावातील परशुराम चोपडे यांनी बिबट्याची हालचाल आपल्या मोबाईलमध्ये कैद केली आहे.त्यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.