Share News

 

राकसकोप जलाशय काठोकाठ

दोन दरवाजे दोन इंचा ने उघडल्याने मार्कंडेय नदीत विसर्ग

आता केवळ पावणेदोन फूट पाण्याची आवश्यकता

बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय भरण्याच्या मार्गावर आहे गेल्या चार दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जलाशय काटोकाठ झाला असून बेळगाव शहराची पाण्याची समस्या आता दूर होणार आहे काल जलाशयाची पाणीपातळी 2472.50 फूट इतकी झाली होती तर आज पावसाचा जोर कायम राहिल्याने आज सायंकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने जलाशय भरण्याची शक्यता आहे

*नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचा आवाहन*

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होऊ लागल्यामुळे जलाशयातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीत सोडण्यात आले आहे मार्कंडेय नदी परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन शहर पाणीपुरवठा मंडळाने केले असून नदी काठावर पुराचा धोका निर्माण होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने कमी प्रमाणात पाणी सोडले जाणार आहे


Share News