Share News

दरड कोसळली, गोव्याचा अनमोड घाट वाहतुकीसाठी बंद, बेळगाव- गोवा वाहतूक विस्कळीत

दरड कोसळली, गोव्याचा अनमोड घाट वाहतुकीसाठी बंद, बेळगाव- गोवा वाहतूक विस्कळीतबेळगाव ते गोवा मार्गे अनमोड घाटादरम्यानची वाहतूक गुरुवारी विस्कळीत झाली होती. रस्त्यावर मातीचा मोठा ढिग साचला होता. त्यामुळे वाहने पुढे जाणे शक्य नव्हते.

दरड कोसळल्याने बेळगाव ते गोवा मार्गे अनमोड घाटादरम्यानची वाहतूक गुरुवारी विस्कळीत झाली होती. रस्त्यावर मातीचा मोठा ढिग साचला होता. त्यामुळे वाहने पुढे जाणे शक्य नव्हते. घाट परिसरातील श्री दूधसागर मंदिराजवळ रस्त्यावर मातीचा मोठा ढीग आला होता. रस्ता मोकळा करण्यासाठी अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. मात्र गुरुवारी सकाळपर्यंत ते काढता आले नाही.

त्यानंतर गुरुवारी दुपारपर्यंत अनमोड घाटातून वाहतूक बंद राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. वाहने जाण्यासाठी मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेमुळे अनमोड घाटात अनेक वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी मोलेम चेकपोस्टवर वाहने थांबवून भूस्खलनाचा इशारा दिला होता.

अनमोड घाट हा गोवा आणि कर्नाटक राज्याला जोडतो. याचा वापर बेळगाव, खानापूर यांसारख्या ठिकाणी जाण्यासाठी होतो. शिवाय कोल्हापूरपर्यंत जाणाऱ्या वाहनांना ही याचा फायदा होता. दूध, भाजीपाला यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी अनेक वाहने याच रस्त्याचा वापर करतात. हा रस्ता बंद झाल्यामुळे गोव्यात जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.


Share News