Share News

बेळगावातील देसूरजवळील अपघातात ग्रा.पं. सदस्य ठार

कारची दुचाकीला धडक -चालकाचे कारसह पलायन

दुचाकीवरुन कामानिमित्त बेळगावला येत असताना अपघात

दुचाकीला मागून आलेल्या भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिल्याने एकजण जागीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला. खानापूर- बेळगाव मार्गावरील देसूर पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. उदय नारायण भोसले (वय ४३, रा. कौंदल ता. खानापूर) असे मृताचे नाव असून ते करंबळ ग्राम पंचायतीचे सदस्य होते. तर प्रशांत बाबुराव पाटील (वय ४२, रा. करंबळ) हे निवृत्त जवान जखमी झाले आहेत.
प्रशांत व उदय दुचाकीवरुन कामानिमित्त बेळगावला येत होते. त्यांची दुचाकी देसूरनजीक मागून असता भरधाव वेगाने येणाऱ्या महिंद्रा टीयुव्ही ३०० कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत मागे बसलेले उदय उडून रस्त्यावर आपटले. बरेच अंतर फरपटत गेल्याने त्यांच्या डोकीलगंभीर दुखापत होऊन जागीच ठार झाले. अपघातानंतर चालकाने कारसह पलायन केले


Share News