Share News

चलवेनहट्टीत शिवाजी कागणीकर यांचा होणार सत्कार

मस्णांगाई सौहार्द सोसायटीच्या वतीने सत्कार सोहळचे आयोजन
पर्यावरण प्रेमी जेष्ठ समाजसेवक तसेच नुकताच राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आलेल्या शिवाजी दादा कागणीकर यांचा भव्य सत्कार होणार आहे. मस्णांगाई सौहार्द सोसायटीच्या वतीने दरवर्षी गुणी विद्यार्थीचा सत्कार करण्यात येत असतो त्याच पद्धतीने यावेळी समाज कार्याला वाहून घेणारे जेष्ठ समाजसेवक शिवाजी दादा कागणीकर यांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. रविवार दिनांक १८ जानेवारी रोजी सकाळी ११-०० वाजता मराठी शाळेच्या प्रांगणात हा सोहळा होणार आहे.या सत्कार सोहळ्यासाठी चेअरमन व्हा.चेअरमन सेक्रेटरी सर्व संचालक व‌ सल्लागार मंडळ कर्मचारी वर्ग उपस्थित राहणार आहेत.तरी सामाजिक कार्यकर्ते पंचक्रोशीतील तसेच गावातील युवक मंडळे महिला मंडळे पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे. श्री मस्णांगाई सौहार्द सहकारी सोसायटीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.


Share News