Share News

  • अद्याप कोकण रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा नाही

कालपासून उत्तर गोव्यातील मालपे पेडणे येथे बोगद्यात जमा होणाऱ्या चिखल व मातीमुळे कोकण रेल्वेचे वाहतूक ठप्प झाले आहे. रेल्वे रुळावरील माती हटवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून आज दिवसभरात हे काम पूर्ण होईल असे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. काल संध्याकाळपासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र रात्री साडेदहा नंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली होती. बुधवारी पहाटे पुन्हा कोकण रेल्वेच्या मार्गावर पावसामुळे माती जमा झाल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या माती व चिखलाचा भराव हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.


Share News