गोवा राज्यात मुसळधार पावसामुळे राजधानी पणजी सह अनेक शहरात पूर परिस्थिती
गोवा राज्यात मागच्या दोन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजधानी पणजीसह राज्यातील अनेक शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. मुसळधार कोसळणारा पाऊस व समुद्राला आलेली भरती यामुळे अनेक सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे.
राजधानी पणजी शहरातील अनेक सखल भागात पाणीच भरल्याने कित्येक वाहने पाण्यात अडकून राहिलीत. पाण्यातून वाट काढताना अनेक वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पणजीतील औद्योगिक वसाहतीतच पाणी साचल्याने कामावर आलेल्या अनेक नागरिक व कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल झालेत.