मुंबई गोवा महामार्गावर दगड कोसळून वाहतूक ठप्प
मुंबई गोवा महामार्गावर सोमवारी सकाळच्या सुमारास उत्तर गोव्यातील पेडणे येथे दरड कोसळण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामावेळी डोंगर कापून संरक्षक भिंत उभारण्यात आली होती. मात्र मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे रविवारी रात्रीपासूनच दरड कोसळायला सुरुवात झाली आहे. रस्त्यावर माती व दगडांचा खच पडल्यामुळे काही वेळासाठी दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. सध्या एकेरी मार्गावरची माती हटवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. सध्या अग्निशामन दलाच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावरची माती व दगड हटवण्याचे काम सुरू आहे.