•कुमट्याजवळ पुन्हा दरड कोसळली
कारवार
कुमठाजवळच्या बर्गी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पुन्हा दरड कोसळली आहे आपण पाहतोय हा ड्रोन व्हिडिओ राष्ट्रीय महामार्ग 66 वरचा आजचा आहे
चार दिवसापूर्वी येथे दरड कोसळली होती ती दरड कोसळण्याचे प्रमाण कमी असल्याने एका बाजूने वाहतूक बंद ठेवून दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू ठेवण्यात आली होती केली पण आता दरड कोसळण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याने या रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे
सुदैवांनी आजच्या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही सदर दरड हटवण्यासाठी आयआरबी बांधकाम कंपनी कामाला लागली आहे पोलीस प्रशासन अधिकारी घटनस्थळी तळ ठोकून आहेत
दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी झालेल्या दरडीमध्ये आणखी दोन मृतदेह सापडले आहेत दुर्घटनेतील मृतांचा आखाडा आता सहावर पोहोचला आहे
तर दुर्घटना घडलेल्या दिवशी चार मृतदेह सापडले होते राष्ट्रीय महामार्ग 66 वर दरड कोसळून काही व्यक्ती मातीच्या ढिगार्याखाली गाडले तर अन्य काही व्यक्ती मातीच्या ढिगार्याखातून गंगावळी नदीत वाहून गेले आहेत
या घटनास्थळापासून सुमारे 30 ते 40 किलोमीटर अंतरावरील मजगुनी -गोकर्ण येथे अवंतिका नाईक या मालिकेचा मृत्यू आढळून आला आहे
मागील दोन आठवड्यापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे रोजच विस्कळीत जनजीवनाचा सामना करणारे जिल्हा वासिया अक्षरशः त्रस्त होऊन गेले आहेत
सर्वत्र पाणीच पाणी ठीक ठिकाणी दरडी कोसळणे वाहतूक ठप्प होणे आदीमुळे जनता मेटाकोटीला आली आहे हवामान खात्याकडून जोरदार पावसाचा इशारा आहे दील्याने जनतेची चिंता वाढत चालली आहे