Share News


बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारार्थ शहरात रॅली

बेळगाव लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांच्या प्रचारार्थ आज शहरांमध्ये बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या बाईक रॅलीची सुरुवात किल्ला तलाव येथील दुर्गा मंदिरापासून करण्यात आली.

त्यानंतर शहराच्या विविध मार्गावरून ही रॅली निघाली या रॅलीत मोठ्या प्रमाणात दुचाकी घेऊन महिला तसेच बीजेपी कार्यकर्ते सहभागी झाले होते. आपकी बार मोदी सरकार, हर हर मोदी घर घर मोदी, आपकी बार चारसो पार अश्या अनेक घोषणा देत बीजेपी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात शहरात रॅली काढत काढली.

कित्तूर चन्नम्मा सर्कल, धर्मवीर संभाजी महाराज चौक, गोवावेस सर्कल येथील बसवेश्वरांच्या मूर्तीला पुष्पहार घालून शेट्टर यांनी अभिवादन केले. त्यानंतर या रॅलीची सांगता सदाशिव नगर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात करण्यात आली


Share News