Share News

तोतया सीबीआय अधिकाऱ्याला अटक

बनावट सीबीआय, ईडी, आयटी अधिकारी बनून केले कोट्यवधी रुपये गोळा

बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयात हजर :कारागृहात रवानगी

माळमारुती पोलिसांनी बनावट सीबीआय अधिकारी बनून लाखोंची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला अटक करून कारागृहात धाडले .
वमाळमारुती पोलिसांनी हुक्केरी तालुक्यातील इस्लामपूर येथून दयानंद रामू जिनराळ नावाच्या तोतया सीबीआय अधिकाऱ्याला अटक केली आहे. त्यांनी ट्रेनिंग स्कूल उघडून मी बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या देईन, असा विश्वास दाखवून प्रसंगी बनावट सीबीआय, ईडी, आयटी अधिकारी बनून कोट्यवधी रुपये गोळा केले. मालमारुती पोलिसांनी या तोतया अधिकाऱ्याला अटक केली असून त्याची रवानगी कारागृहात धाडले . आरोपीला बेळगाव द्वितीय जेएमएफसी न्यायालयात हजर करण्यात आले.
शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन आणि डीसीपी स्नेहा पीव्ही यांनी माळमारुती सीपीआय जे एम कालीमिर्ची आणि टीमचे कौतुक केले आहे.


Share News