भांडी दुकानाच्या गोदामातील लाखो रुपये किमतीची भांडी लंपास
बेळगाव शहरातील गांधीनगर येथील एका भांडी दुकानाच्या गोदामातील लाखो रुपये किमतीची तांब्या पितळेची भांडी चोरट्यांनी काल रात्री लंपास केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
राष्ट्रीय महामार्गाजवळील गांधीनगर येथील अभि मेटल स्टोअर्स या दुकानांमध्ये हा चोरीचा प्रकार घडला आहे. काल शुक्रवारी रात्री उशिरा या भांड्याच्या दुकानाचे गोदाम फोडून चोरट्यांनी तांबे, पितळ, अल्युमिनियम आणि स्टील अशी एकूण तब्बल 30 लाख रुपये किंमतीची भांडी चोरून नेली असल्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय महामार्ग जवळच असल्यामुळे विनासायास इतक्या मोठ्या प्रमाणात भांडी चोरून पोबारा करणे चोरट्यांना शक्य झाले असावे दुकान मालकांनी आज शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडले असता सदर चोरीचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
याबाबतची माहिती त्यांनी पोलिसांना देताच माळमारुती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पाहणी अंती पंचनामा केला. याप्रकरणी माळ मारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी तपास कार्य हाती येते आहे.