कर्नाटक – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाट सहा चाकी तसेच याहून अधिक चाकी वाहनांसाठी तीन महिन्यासाठी पूर्णता बंद
अनमोड घाट मार्गावरून चार चाकी वाहनांना प्रवेश
जिल्हाधिकाऱयांचा आदेश
कर्नाटका पासून गोवा येथे जाणाऱ्या राष्ट्रीय मार्गावरील अनमोड घाटात गुरुवार दिनांक 11 पासून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत सहा चाकी तसेच याहून अधिक वाहनांना पूर्णता बंदी असल्याचा आदेश कारवार जिल्हा जिल्हाधिकारी यांनी काढला आहे .तर हुबळी मार्गे येणारे अवजड वाहने यल्लापूर कारवार मार्गे गोवा येथे जाण्याचा आदेश आहे.तर बेळगाव येथून येणारी अवजड वाहने चोर्ला घाट मार्गे वळवण्यात आली आहे तर फक्त अनमोड घाट मार्गावरून चार चाकी वाहनांना तितकाच प्रवेश घोषित करण्यात आला आहे .या ठिकाणी झालेला मोठया पावसामुळे ठीक ठिकाणी पडलेले खड्डे झाल्याने इतर वाहनांना होणाऱ्या त्रासामुळे अवजड वाहनांना बंदी घालण्यात आल्याचा आदेश कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे.