कृष्णा कृष्णा काठाला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट
चिकोडी
शेजारच्या महाराष्ट्र राज्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिकोडी तालुक्यातील कृष्णा वेदगंगा दूधगंगा नद्यांचे पाणी पात्र बाहेर वाहत असून संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन आज बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी कृष्णा नदी काठाला भेट देऊन पाहणी केली.
सुरुवातीला कृष्णा नदीवरील अंकली मांजरी पुलावर भेट देऊन कृष्णा नदीच्या पात्राची पाहणी केले. त्यानंतर त्यांनी येडूर येथे जाऊन बोटीतून कृष्णा नदीत जाऊन पुरा वेळी नागरिकांचे व जनावरांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांविषयी अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. शेजारच्या महाराष्ट्र राज्यात मुसळधार पाऊस पडत असून मोठ्या प्रमाणात नद्यांना पाणी वाहून येत असल्याने चिकोडी तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढवत आहे. त्यामुळे संभाव्य परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासह आवश्यक तयारी करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
त्यावेळी बोलताना जिल्हाधिकारी रोशन म्हणाले सध्या जिल्ह्यामध्ये पूरस्थिती नसून सर्व आवश्यक उपाययोजना व खबरदारी घेण्यात आली आहे. सध्या 26 बोट सज्ज असून आणखीन बोटीची गरज भासल्यास कारवारहून मागून घेण्यात येईल असे सांगितले.
लवकरच एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या तुकड्या चिकोडी परिसरात तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी चिकोडीचे प्रांताधिकारी सुभाष संपगावी, तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्यासह महसूल जलसंपदा व पोलीस खात्याचे अधिकारी उपस्थित होते.