बेळगाव गणेश फेस्टिवलचा थाटात प्रारंभ,कोमल कोलकुप्पी होम मिनिस्टर विजेत्या
बेळगाव – येथे आयोजित केल्या जाणाऱ्या बेळगाव गणेश फेस्टिवलचा आज मंगळवारी होम मिनिस्टर स्पर्धेने थाटात प्रारंभ झाला. श्री माता सोसायटी,भक्ती महिला सोसायटी,राजमाता महिला सोसायटी,समर्थ सोसायटी व ज्ञानमंदिर इंग्रजी शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने गणेश फेस्टिवल अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षीच्या पहिल्या दिवशी गणेश फेस्टिवल अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धच्या विजेतेपदाचा मान कोमल कोलकुप्पी यांना प्राप्त झाला. अंकिता पाटील उपविजेत्या ठरल्या.
न्यु गुडशेड रोड येथील श्रीमाता सोसायटीच्या सभागृहात होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या प्रारंभी राजमाता सोसायटीच्या चेअर पर्सन मनोरमा देसाई तसेच श्री भक्ती सोसायटीच्या चेअरपर्सन ज्योती अग्रवाल यांच्यासह अन्य संचालिकांचे हस्ते दीप प्रज्वलन, गणेश पूजन करून आरती करण्यात आली.डॉक्टर मीना पाटील यांच्या हस्ते गणेश मूर्तीचे पुजन करण्यात आले. बेळगावच्या येथील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा.या उद्देशाने गेली 25 वर्ष बेळगावात गणेश फेस्टिवल चे आयोजन केले जाते. गणेश फेस्टिवल मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा नवरत्न सन्मान केला जातो.महिला स्पर्धांना प्राधान्य दिले जाते. महिलांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन त्यांना प्रोत्साहन दिले जात.
आज पार पडलेल्या विनायक बांदेकर प्रस्तुत होम मिनिस्टर स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. विनायक बांदेकर यांनी, कार्यक्रमात उपस्थित महिलांसाठी मनोरंजनात्मक विविध खेळ घेतले.महिलांना घरगुती कामातून विरंगुळ मिळावा आणि एक दिवस मनोरंजन व्हावे यासाठी होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा बेळगाव येथील महिलांनी काल मनसोक्त आनंद लुटला. होम मिनिस्टर च्या अंतिम फेरी विजेत्या कोमल कोलकुप्पी यांनी प्राप्त केला. विजेत्या आणि उपविजेत्यांना बी.आर पावटे यांच्याकडून पैठणी साड्या भेट देण्यात आल्या.
कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत ज्योती अग्रवाल यांनी केले सूत्रसंचालन प्रतिभा नेगीनहाळ यांनी केले. आभार प्रदर्शन रूपाली जनाज यांनी केले.श्रीकांत काकतीकर यांनी विनायक बांदेकर यांचा परिचय करून दिला. विलास अध्यापक यांनी बांदेकर यांचा सत्कार केला.
उद्या बुधवारी दुपारी तीन वाजता महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.यामध्ये वरीच्या तांदळाचे गोड पदार्थ- तिखट पदार्थ स्पर्धा आहेत.

