श्री गणेश फेस्टिवल बेळगाव चा जागर लोक संस्कृतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
श्री भक्ती महिला सोसायटी श्री राजमाता महिला सोसायटी श्रीमाता सोसायटी व ज्ञानमंदिर इंग्लिश माध्यम स्कूल आयोजित श्री गणेश फेस्टिवल बेळगाव आज तिसरा दिवस गणेश पूजन व आरती करून श्री अभिजीत कालेकर प्रस्तुत *जागर लोक संस्कृतीचा* या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ गणेश पूजन करून श्री राजमाता महिला सोसायटीच्या अध्यक्ष सौ मनोरमा देसाई प्रतिभा नेगीनहाळ श्री भक्ती महिला सोसायटीच्या अध्यक्ष ज्योती अग्रवाल श्री माता सोसायटीच्या संचालिका डॉ सौ मीना पाटील यांच्या हस्ते झाले अभिजीत कलेकरांचा सत्कार भक्ती सोसायटीचे मॅनेजर श्री अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भक्ती महिला सोसायटी व श्री राजमाता सोसायटीच्या कर्मचारी वर्गांनी विशेष परिश्रम घेतले.

