व्हॉईस क्लोनिंगपासून सावध रहा
टेक्नॉलॉजी दिवसेंदिवस प्रगत होत आहे, त्यामुळे फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. एआय आल्यानंतर अशा प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जर तुम्हाला घरातील कोणीतरी अचानक फोन करून पैसे मागितल्यास त्यावर लगेच विश्वास ठेवू नका. थोडे शांत होऊन विचार करून निर्णय घ्या. कारणं ती व्यक्ती तुमच्या कुटुंबातील सदस्य नाही तर स्कॅमर असू शकते.
सायबर क्रिमिनल व्हॉईस क्लोनिंग करून लोकांना फसवत आहेत. व्हॉईस क्लोनिंगच्या मदतीने एखाद्याचा आवाज हुबेहूब काढता येतो. याचा वापर तुमची फसवणूक करण्यासाठी आणि माहिती चोरण्यासाठी केला जाऊ शकतो.