काय ,स्मार्ट फोन चोरीला गेलाय ?
मोबाईल फोन चोरीला गेल्यानंतर चांगलीच पंचाईत होते. फोनमधला महत्त्वाचा डाटा, फोटो, व्हीडिओ लीक होण्याची भीती वाटत राहते. मात्र तुम्ही हा डाटा घरबसल्या डिलिट करू शकता.
यासाठी माय डिव्हायसेस गूगल डॉट कॉमवर जा. स्मार्टफोनमध्ये सेव्ह केलेला जी मेल आयडी ओपन करा. इथे प्ले साउंड, सिक्योर डिव्हाइस आणि इरेझ डिव्हाईस असे पर्याय दिसतील.
यापैकी इरेझ डिव्हाइसची निवड करा. यानंतर जीमेल आयडी आणि पासवर्डची नोंद करून पुढे जा. आता तुमच्या जुन्या फोनमधला डाटा डिलिट झाला असेल. अर्थात यासाठी जुन्या फोनचे इंटरनेट कनेक्शन ऑन असायला हवे.