Share News

मालवाहू जहाजाला गोव्या नजीकच्या समुद्रात आग

जहाज गुजरातहून कोलंबीच्या दिशेने जात होते.

इंडियन कोस्ट गार्ड अग्निशामन दलाच्या वतीने आग विझवण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री लागली होती जहाजाला आग.

गोव्याच्या नैऋत्येस 102 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या मालवाहू जहाजाला मोठी आग लागली.

गोव्याच्या नैऋत्येस सुमारे 102 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या कंटेनर मालवाहू जहाजाला शुक्रवारी रात्री मोठी आग लागली होती. खराब हवामान आणि मुसळधार पावसासह आव्हानात्मक परिस्थिती असूनही भारतीय तटरक्षक दल व अग्निशमन दलाच्या वतीने ही आग विझवण्यात आली . हे जहाज आंतरराष्ट्रीय सागरी धोकादायक माल घेऊन जात असल्याची माहिती समोर आली आहे.
खराब हवामान आणि मुसळधार पावसात आंतरराष्ट्रीय सागरी धोकादायक माल वाहून नेणाऱ्या जहाजावर इंडिया कोस्टगार्ड व अग्निशमन दल यांच्यावतीने आग विझवण्यात आली आहे.
हे मालवाहू जहाज गुजरातहून कोलंबो श्रीलंकेच्या दिशेने जात होते.


Share News