Mayor |कोण होणार महापौर उपमहापौर ?
बेळगाव महानगरपालिकेतील महापौर आणि उपमहापौर पदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने महानगरपालिकेमध्ये आज महापौर आणि उपमहापौर पदाकरिता निवडणूक झाली
22व्या टर्म करिता महापौर अनुसूचित जाती महिलांसाठी आणि उपमहापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला होता
सत्ताधारी भाजपकडे 58 पैकी 35 सदस्यांचे स्पष्ट बहुमत होते.त्यामुळे महापौर आणि उपमहापौर ही दोन्ही पदे भाजपकडे गेली
भाजपमधून सविता कांबळे लक्ष्मी राठोड यांनी महापौर पदाकरिता उमेदवारी अर्ज सादर केला. माधवी राघवचे आनंद चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.तर काँग्रेस मधून उपमहापौर पदाकरिता शमोबीन पठाण ,ज्योती कडोलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच भाजप आणि काँग्रेसच्या च्या कोर कमिटीची बैठक झाली.
सध्या महानगरपालिकेमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे प्रक्रिया झाल्यानंतर निकाल लागणार आहे त्यामुळे सर्वांच्या नजरा या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीकडे आहेत.Corporation election Mayor |कोण होणार महापौर उपमहापौर ?