महापालिकेच्या अर्थसंकल्पात बेळगावकरांसाठी या तरतूदी
बेळगाव महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज विशेष बैठकीत मंजूर करण्यात आला. महसूल स्थायी समितीच्या सभापती वीरा विजापुरे यांनी बेळगाव महापालिकेचा सन 2024 25 चा सुमारे 7 लाख 72 हजार रुपयांचा बचतीचा अंदाजपत्रक सादर केला महापौर सविता कांबळे उपमहापौर आनंद चव्हाण आणि इतर नगरसेवक उपस्थित होते.
या अर्थसंकल्प संदर्भात नगरसेवक हनुमंत कोंगाली यांनी माहिती दिली सन 2024- 25 चा अर्थसंकल्प बेळगावचा सर्वांगीण विकास आणि शहरातील नागरिकांचा विचार करून संकल्प करण्यात आला आहे.बेळगावला सुंदर शहर बनविण्यासाठी आणि चांगले वातावरण मिळावे यासाठी आम्ही लोकाभिमुख विकास कार्यक्रम सुरू केला आहे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती महिला शालेय मुली अपंग यांच्या फायद्यासाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. असे सांगितले.
स्मार्ट सिटी प्रकल्पासह शहरातील चौकांचे सुशोभीकरण आणि रस्ते तसेच बस स्थानकाचे सुशोभीकरण हे प्रकल्प प्रमुख असल्याचे सांगितले तसेच शहरातील दैनंदिन वाहनांच्या वाहतुकीची भरपाई करण्यासाठी महापालिकेने रिकामे जागेचे विश्रांती थांबे आणि बाजारपेठेत रुपांतर केले आहे उत्पन्नात वाढ होण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व लोखाभिमुख कार्यक्रम हाती घेऊन शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींकडून सल्ला व सूचना घेऊन बेळगावच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार करण्याची दिशेने वाटचाल करणे या अंदाजपत्रकातील महत्त्वाच्या बाबी आहेत असे स्पष्ट केले.
याप्रसंगी अर्थसंकल्पाच्या मंजुरीवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला यासंदर्भात विविध उद्यांवर चर्चा करण्यात आली. तसेच विरोधी गटाच्या नगरसेवकांनी अनेक स्पष्टीकरणांची मागणी केली मात्र सत्ताधारी गटाने हा अर्थसंकल्प मंजूर झाल्याचे सांगितले.