ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मध्ये सीलबंद
आरपीडी महाविद्यालयात होणार मतमोजणी
कडक पोलीस बंदोबस्त तैनात
लोकसभेसाठी राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले असून उमेदवारांचे भवितव्य मशीन बंद झाले आहे.
बेळगाव मतदार संघातील ईव्हीएम मतमोजणी होणाऱ्या आरपीडी महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये सीलबंद करण्यात आल्या आहेत. मतमोजणी 4 जून रोजी होणार असून महाविद्यालय परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बेळगाव मतदारसंघ समाविष्ट असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघातील सर्व ईव्हीएम पोलीस बंदोबस्तात आरपीडी महाविद्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये आणण्यात आल्या आहेत. मशीन व्यवस्थितपणे ठेवल्यानंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम सील करण्यात आला आहे.