Share News

दौडीचे गल्लोगल्ली स्वागत

हजारो धारकऱ्यांचा दौडीत सहभाग

देश धर्म आणि रक्षणासाठी निघालेली आजच्या तिसऱ्या दिवशीची दौड शहराच्या विविध मार्गावर निघाली. यावेळी दौडीचे गल्लोगल्ली स्वागत करण्यात आले ठीक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती तसेच लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा साकारली होती. यावेळी दौडचे पुष्प यावेळी दौडीवर पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
आजची श्री दुर्गामाता दौडीची सुरुवात श्री गणेश मंदिर, चन्नम्मा सर्कल इथून सुरुवात झाली.प्रेरणा मंत्र म्हणून गणपतीची आरती करून पोलीस अधिकारी कट्टीमनी एसीपी क्राईम यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला.
खडक‌ गल्ली चव्हाट गल्ली संपूर्ण शिवाजीनगर भाग, गांधीनगर भागातून निघून किल्ला येथील दुर्गादेवी मंदिर येथे सांगता झाली.
शिवाजी नगर येथे लहान मुलांनी देखावे सादर केले होते तसेच मंदिरांच्या प्रतिकृती स्वागतासाठी ठेवण्यात आल्या होत्या.
गांधीनगर येथे शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा सादर करण्यात आला होता.
किल्ला येथे महार रेजिमेंटच्या वतीने दुर्गा माता दौडीचे स्वागत करण्यात आले .यावेळी कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम सिंग सांकला तसेच सीपीआय महातेंश दामन्नवर यांच्या हस्ते ध्वज उतरविण्यात आला. यावेळी लेफ्टनंट कर्नल गौरव शेगाव सुभेदार केम्पंना पाटील सुभेदार शेखर पाटील एक्स सुभेदार एम कित्तूर एक्स सुभेदार अशोक कंदाडे एक्स सुभेदार परशराम मुरकुटे हे उपस्थित होते.


Share News