Share News

काँग्रेस सरकारचा विरोध करत भाजपने छेडले आंदोलन

बेंगलोर येथील विधानसभेमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बेळगाव सह राज्यपापी आंदोलन पुकारण्यात आले. काँग्रेस पक्षाचे उमेदवार सय्यद नासिर हुसेन यांच्या समर्थकांनी राज्यसभा निवडणूकीत विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज मोर्चा काढून करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शन करण्यापूर्वीच पोलिसांनी सर्वांना अटक केली.

शहरातील चन्नम्मा सर्कल येथे काँग्रेस सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून काँग्रेस सरकारचा धिक्कार असो पाकिस्तान मुर्दाबाद नासिर हुसैन यांचे सदासत्व रद्द करा अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यानंतर सर्व भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाला घेरावा घालण्याकरिता गेले असता रस्त्यामध्येच पोलिसांनी त्यांना अटक केली.

विधानसभेमध्ये पाकिस्तान समर्थक घोषणा देणाऱ्या व्यक्तींवर देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करण्यात यावा आणि योग्य तो तपास हाती घेऊन निकाल जाहीर होईपर्यंत राज्यसभेचे सदसत्व म्हणून शपथ घेऊ नये अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे सदस्यांनी केली आहे


Share News