फलकांवर कन्नड नसल्याने फलक फडला
फलक काढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्याना अटक
कन्नड रक्षण वेदीकेच्या मूठभर गुंडांनी आज बेळगाव मध्ये पुन्हा थयथयाट केला. व्यवसायिक औद्योगिक हॉटेल, दुकान यासह अनेक ठिकाणी फलकांवर 60% मजकूर कन्नड मध्ये असावा यामागणी साठी चन्नमा सर्कल मध्ये ठाण मांडून निदर्शने केली. तसेच ज्या फलकावर कन्नड भाषेत मजकूर नाही तो फलक काढण्याचा प्रयत्न केला यावेळी फलक काढण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मूठभर कन्नडीगांना पोलिसांनी अटक केली.
राज्य सरकारने 28 फेब्रुवारी पर्यंत सर्व दुकानांच्या फलकांवर कन्नड मजकूर लिहिण्याचा आदेश दिला होता.मात्र हा आदेश अनेकांकडून पाळणा गेला नसल्याने फलकावरती कन्नड पेक्षा इतर भाषेचा मजकूर असल्याने कन्नड रक्षण वेदिकाच्या गुंडानी आज बेळगाव शहरात थयथयाट करत फलक काढण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली.