Share News

पोलिसांच्या आदेशामुळे कन्नड संघटनांचा धुडगूस घालण्याचा प्रयत्न फसला

बेळगावात आज कन्नड रक्षण वेदिके सह विविध कन्नड संघटनाने एकत्रित येत 60% फलक हा कन्नडमध्येच असावा याकरिता आंदोलन केले. यावेळी कन्नड संघटना बेळगाव मध्ये धुडगुस घालू नये, आणि इतर आस्थापनांवर कन्नड बोर्ड नसल्यास दादागिरी करून तो फलक काढण्यास मज्जाव करू नये अशी अट घालून त्यांच्याकडून परिपत्रकावर पोलिसांनी सही घेतली. आणि वेगवेगळ्या अटींवर त्यांना आंदोलन करण्यास परवानगी दिली

बेळगाव गावातील अनेक आस्थापने, व्यवसायिक दुकाने सार्वजनिक ठिकाणी यासह इतर दुकानांची कन्नड संघटनाने कन्नड मध्ये फलक नसल्यास त्याची मोडतोड करू नये त्या उलट त्यांना सूचना द्यावी असे पोलीस प्रशासनाकडून अट घालण्यात आली.यावेळी पदाधिकाऱ्यांनी टाळाटाळ करत परिपत्रकावर सही करण्यास नकार दिला. व पोलिसांसमवेत हुज्जत घातली.

जर परिपत्रकावर सही न केल्यास आंदोलन पुढे जाणार नाही सर्वांना इथेच अटक करू असा पोलिसांनी इशारा दिला. बेळगाव मध्ये कोणत्याही ठिकाणी नुकसान झाल्यास सर्वस्वी जबाबदार राहतील असे ठणकावून सांगितल्यावर कन्नड संघटनांनी एपीटीसीएल हॉल पासून ते हॉटेल रामदेव, डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्ग, त्यांना सर्कल येथे आंदोलन करत दाखल झाले आणि या ठिकाणी निदर्शने केली.


Share News