Share News

सुप्रीम कोर्टचा आदेश असून देखील कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष

बेळगाव शहरात दरवर्षी 20,000 कुत्रे चावण्याच्या घटना घडत आहेत.
महानगरपालिका आणि पोलीस विभाग कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यात आपले कर्तव्य पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत आणि त्याशिवाय रस्त्यावरील कुत्र्यांच्या हल्ल्यांपासून मानववस्तीचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत .सुप्रीम कोर्टाने भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करावा आणि त्यांना ठार मारावे असा आदेश देखील दिला आहे परंतु महापालिका कुत्र्यांचा बंदोबस्त देखील करत नाही असे वक्त्यव्य ऍडव्होकेट असोसिएशन फॉर ह्यूमन राईट्सच्या सदस्यानी केले.

यावेळी ते नदाफ म्हणाले कीसध्या कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, मन्नत कॉलनी, महांतेश नगर परिसरात एका कुत्र्याने एकाच वेळी 14 जणांवर हल्ला केला असून, कैफ पाच्छापुरी आणि ऐजल पठाण ही दोन लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. मुलगा कैफ याच्या चेहऱ्यावर केएलई हॉस्पिटल मध्ये मोठी प्लास्टिक सर्जरी करण्यात आली असून कुत्र्यांच्या हल्ल्यात त्याच्या डोक्याला खोलवर जखमा झाल्या आहेत. वडगाव परिसरातील अन्य एका घटनेत विशाल आणि संतोष ही मुले देखील कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झाली आहेत.

प्राणी जन्म नियंत्रण (कुत्रे) नियम 2023 अंतर्गत रस्त्यावरील कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्याचे कर्तव्य महापालिकेचे आहे.मात्र त्या महापालिका अपयशी झाली असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.त्यामुळे कुत्र्यांचा बंदोबस्त करावा


Share News