संभाव्य धोका ओळखून बळ्ळारी नाल्याच तोंड खुल कराव
गेल्या अनेक वर्षापासून बळ्ळारी नाला विकास प्रश्न रेंगाळतच आहे.शेतकरी संघटना तसेच शेतकऱ्यांच्या वतीने त्याची खुदाई करुन गाळ काढून परिसरातील शेतकऱ्यांना पीकं घेण्यासाठी अनूकूल व्हाव म्हणून निवेदन दिली.पण त्याचा कांहीच उपयोग न होता फक्त आश्वासनांचा पाऊस पाडत शेतकऱ्यांना झुलवतच ठेवले.
गेल्या चार दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने खरिप पेरणी केलेली पीकं पाणी,मुळका एक होऊन कूजून गेल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवते कि काय याच विवंचनेत शेतकरी पडलाय.गेल्यावर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाला पण ऐन बहराच्या काळात पाऊस गेल्याने भातपीकांची वाढ न झाल्याने पीकं करपून उत्पन्न कमी झाले.त्यातच खरिप पीकंही अल्प मीळाल्याने शेतकरी कसाबसा तरलाय.सरकारच्या तुटपुंज्या भरपाईने तर शेतकरी नाराजच झालाय.
आता पावसाला चांगली सुरुवात झाल्याने पीकं वाचण्यासाठी बळ्ळारी नाला व परिसरातील छोटे नाले स्वच्छ करण हे प्रशासनाचे काम असल्याने येळ्ळूर रस्त्यापासून सूरु होणाऱ्या बळ्ळारी नाल्याचे मुख्य तोंडच बंद झाल्याने येळ्ळूर, मजगाव,मच्छे, अनगोळ,वडगाव शिवार तसेच गावातूनही येणारे पाणी अडून बसल्याने अनगोळ शिवारात आत्ताच बायपास पर्यंत पाणी थांबले आहे.याला मुख्य कारण नाला तोंडासमोरच समोरच अनगोळ शिवारात सर्वे नं.271/272 या शेतकऱ्यांने आपल्या शेतात प्रचंड माती टाकल्याने नाल्यात पाणी जाण्यासाठी वाटच बंद करुन टाकली आहे. पर्याय म्हणून वरती करुन दोन पाईप घातल्या आहेत पण त्यातून पाणी जाने अवघड त्यातच स्मार्टसिटी योजनेतून सकाळी फिरणाऱ्यासाठी म्हणून फूट पाथ बांधलाय त्याखाली सिध्दिविनायक मंदीरपासून नाल्यापर्यंत जी गटार बांधली आहे तिची उंचिही वरच असल्याने संबधीत अधिकाऱ्यांनी आता प्रत्यक्ष पहाणी केल्यास तेथील संभाव्य परिस्थिती लक्षात येईल आणी बळ्ळारी नाल्याचे तोंड कसे बंद आहे ते समजेल.
तेंव्हा प्रशासन जसे शहरातील नाले सफाई सुरु आहे तशी यावर्षी हवामान खात्याने चांगला किंवा मुसळधार पाऊस होईल अशी माहिती दिल्याने संभाव्य धोका ओळखून बळ्ळारी नाल्याचे तोंड खूले करुन अनगोळ,येळ्ळूर,मजगाव शिवारातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा तसेच बायपासच्या कामाने येळ्ळूर, मजगाव शिवारातून येणारे पाणी आडवणूक होऊनये म्हणून ज्या ठिकाणी नाले आहेत ते बंद झाले आहेत ते पूर्ववत करुन तेथील शेतकऱ्यांनाही दिलासा द्यावा.अन्यथा 2019 पेक्षा मोठी बाकट परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय रहाणार नाही.तेंव्हा प्रशासनाने संभाव्य धोका ओळखून बळ्ळारी नाल्याचे तोंड खूले करत कर्नाटक भू महसूल कायदा 1964 कलम 95 प्रमाणे क्रूषी जमीनीच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करुन परिसरातील शेतकरी वाचवल्यास सरकार तसेच संबधीत प्रशासनास धन्यवाद दिल्याशिवाय रहाणार नाहीत.
आणी जर तिथे पूर परिस्थिती निर्माण झाली तर परिसरातील शेतकरी येळ्ळूर रस्त्यावर पाण्यातच रास्तारोको करतील यात तिळमात्र शंका नाही.