Share News

नाताळची सुट्टी जाहीर करणे हा हिंदू धर्माचा अपमान -दसरा सणात परीक्षा न घेता सुट्टी देण्याची मागणी

हिंदू संस्कृती टिकविण्याची मागणी

श्री राम सेनेचे आंदोलन

दसरा सणाच्या काळात शाळेतील मुलांना सुट्टी न देता त्यांच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. त्यामुळे आज राम सेनेच्या कार्यकर्त्यांनीआंदोलन करून जिल्हाधिकारी आणि डीडीपीआय कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन केले आहे .जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले .

या निवेदनात त्यांनी नाताळची सुट्टी जाहीर करणे हा हिंदू धर्माचा अपमान आहे, अशी मागणी केली आहे.
दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना दसऱ्याच्या वेळी सुट्टी दिली जात होती. मात्र आता ते मुद्दाम दसरा सणाच्या दिवशी शाळा काढत आहेत. मात्र ख्रिसमसच्या दिवशी शाळांना सुटी देणे योग्य नाही, अशी तक्रार त्यांनी निवेदनात केली
तसेच बेळगाव येथील काही खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये हिंदू शाळेतील विद्यार्थ्यांना बायबल वाचण्याची सक्ती केली जात आहे. ते शिक्षण क्षेत्रात येत नाही. यावर आळा घातला नाही तर आपली हिंदू संस्कृती नष्ट होईल, अशी मागणी केली


Share News