Share News

माजी आमदार संजय पाटील यांनी त्या वक्तव्याबद्दल हेब्बाळकर यांची माफी मागावी ; काँग्रेस महिला

 

माजी आमदार संजय पाटील यांच्या निवासस्थानासमोर काँग्रेस महिलांनी निदर्शने केले आणि आक्रमक पवित्रा घेत जर संजय पाटील पुरुष असेल तर त्यांनी बाहेर यावे घरामध्ये लपून बसू नये असा आक्रमक पवित्रा घेत घरासमोर त्यांच्या ठाण मांडले.

आज माजी आमदार संजय पाटील यांनी जगदीश शेट्टर यांच्या प्रचार सभेत दरम्यान महिला आणि बालकल्यांच्या मंत्री तथा ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडले.

यावेळी ते म्हणाले की मी भाजपचा प्रभारी आहे. वेगवेगळ्या भागात मी गेलो मात्र महिलांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात पाहिली नाही. मात्र आज ग्रामीण भागात महिलांची इतकी संख्या पाहिली ही संख्या पाहून लक्ष्मी हेबाळकर यांना झोप येणार नाही त्यामुळे त्यांनी आज गोळी घेऊनच झोपावे असे टीकास्त्र सोडले.

त्यामुळे मंत्री हेब्बाळकर यांचा या वक्तव्याबद्दल अवमान केल्याप्रकरणी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी आज रात्री माजी आमदार संजय पाटील यांच्या हिंदवाडी येथील निवासस्थानासमोर निदर्शने केली.

 

स्वतःला परंपवादी आणि महिलांचे रक्षण करणारा भाजप पक्ष म्हणून घेणारे माजी आमदार संजय पाटील यांनी मंत्री हेब्बाळकर यांच्यावर निंदनीय टीकास्त्र केले आहे तसेच त्यांच्या विरोधात बोलले आहे त्यामुळे सर्व महिलांनी त्यांच्या घरासमोर ठाण मांडून संताप व्यक्त केला.

 

यावेळी महिलांनी माजी आमदार संजय पाटील यांच्यावर पुरुष असेल तर बाहेर यावे लपून का बसावे असा टोला लगावला. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी ताबडतोब हस्तक्षेप केला आणि परिस्थिती मिटवण्याचा प्रयत्न केला मात्र जोपर्यंत संजय पाटील माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा महिलांनी घेत आंदोलन सुरूच ठेवले.


Share News