भाजपचे राज्य उपाध्यक्ष मुर्गेश निराणी यांचा पुतळा करून निषेध
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर टीका निषेध
लिंगायत पंचम साली समाजाच्या नागरिकांनी एकत्रित येऊन केला निषेध
बेळगावात आज लिंगायत पंचमसाली समाजाने कर्नाटक राज्याचे भाजपचे राज्य उपाध्यक्ष मुर्गेश निराणी यांचा निषेध व्यक्त केला. आणि कन्नड साहित्य भवन येथे त्यांच्या पुतळ्या उभारून तो जाळण्याचा प्रयत्न केला यावेळी पोलिसांनी आचारसंहिता लागू असल्याने तो पुतळा बाजूला करून आंदोलकांना शांत केले.
मुर्गेश निराणी यांनी दोन दिवसांपूर्वी बेळगावात झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर त्या पंचमसाली नसल्याची टीका केली होती. लग्नानंतर स्त्रीचे आडनाव बदलते त्याचप्रमाणे हेबाळकर यांचे आडनाव देखील बदलले आहेत त्या लग्नाआधी पंचमसाली समाजाच्या होत्या.मात्र आता त्या पंचमसाली समाजाच्या नसून त्यांनी आपण पंचमसाली समाजाचे आहोत असे नागरिकांना भासू नये असे मत व्यक्त केल्यानंतर आज लिंगायत पंचमीसाली समाजाच्या नागरिकांनी एकत्रित येत मुर्गेश निरानी यांचा निषेध व्यक्त केला